

पुणे : समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत नळजोडाला मीटर बसविण्यास विरोध करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले होते. या आदेशाचा धसका घेत मीटर बसविण्यास होणारा विरोध काही प्रमाणात कमी झाल्याने गेल्या एक महिन्यात तब्बल तीन हजार ६०० मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. मीटर बसविण्यास विरोध करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने गुन्हे नोंदविलेले नाहीत, मात्र पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या माध्यमातून संबंधित नागरिकास नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे.