
पीएमपीने 24 ऑक्टोबरपासून लोहगाव विमानतळावरून शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील पाच मा सेवा सुरू केर्गांवर प्रवासी वाहतूकली आहे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक वातानुकूलित (एसी) बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पुणे - पीएमपीच्या विमानतळ सेवेचे दर कमी करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. मंगळवार (ता. 10) पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
पीएमपीने 24 ऑक्टोबरपासून लोहगाव विमानतळावरून शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील पाच मा सेवा सुरू केर्गांवर प्रवासी वाहतूकली आहे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक वातानुकूलित (एसी) बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, लोहगाव विमानतळावरून 26 ऑक्टोबरपासून रात्रीची विमानसेवा एक वर्षासाठी बंद झाली आहे. सध्या फक्त सकाळी आठ ते रात्री आठ दरम्यान विमानांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे प्रवासी संख्या कमी झाली आहे. 26 ऑक्टोबरपासून दररोज सरासरी 28 ते 32 विमानांची वाहतूक होत असून, त्यातून सुमारे 9 हजार प्रवाशांची ये-जा सुरू आहे. त्यामुळे पीएमपीच्या सेवेला मिळणारा प्रतिसाद कमी झाला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
विमानतळावरून सुटणाऱ्या बससाठी पहिल्या टप्प्यात प्रवासी वाहतुकीसाठी 50, 100, 150 रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आले होते. परंतु प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याने हे दर आता 20, 40, 60 ते 180 रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहेत. प्रवाशांकडून अंतरानुसार वीस रुपयांच्या टप्प्यांत तिकीट दर आकारणी होणार असल्याची माहिती पीएमपीच्या सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूरे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
एसी ई-बसमध्ये प्रवाशांना आरामशीर प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. या बसमध्ये उभे राहून प्रवास करण्यास बंदी आहे. तसेच या बसचा पास हवा असल्यास 22 दिवसांच्या तिकीट दरात 30 दिवसांच्या प्रवासाची सुविधा मिळणार आहे, असेही केरुरे यांनी स्पष्ट केले. विमानतळाच्या कर्मचाऱ्यांनी या मासिक पासची सुविधा घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले.
पाच मार्गांवर बससेवा
लोहगाव विमानतळावरून हडपसर, स्वारगेट, कोथरूड, निगडी आणि हिंजवडी या मार्गांवर बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. विमानांच्या वेळापत्रकानुसार या बसच्या वेळापत्रकाची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना कमीत कमी वेळ थांबावे लागणार आहे. तसेच विमानतळ मार्गावरील बसमध्ये सर्व प्रकारचे प्रवासी प्रवास करू शकतात, असेही केरूरे यांनी स्पष्ट केले आहे.