
पुणे शहरात पावसाळ्याच्या काळात रस्त्यांच्या खोदाईमुळे निर्माण झालेल्या समस्यांनी पुणेकरांना हैराण केले आहे. आज सकाळी वारजे माळवाडी बस स्टॉप येथे पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) एक बस रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात अडकल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या घटनेने पुणे महापालिकेच्या निष्काळजी कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.