
पुणे - पुणे स्टेशन आगारातील एका महिलेचा पाठलाग करून अश्लील हातवारे करून विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील धोंडिभाऊ भालेकर (वय ४४, रा. चऱ्होली फाटा) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३३ वर्षीय महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवार पेठेतील एका हॉटेलमध्ये शनिवार (ता. २२) घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील भालेकर पीएमपीच्या पुणे स्टेशन आगारामध्ये कार्यरत होता. त्यावेळी त्याने महिलेचा पाठलाग केला होता.
त्यामुळे महिलेने त्याच्याविरुद्ध ऑगस्ट २०२३ मध्ये विनयभंगाची तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी त्याने महिलेला मारहाण केली होती. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. खातेनिहाय चौकशीनंतर त्याची न.ता. वाडी डेपोत बदली करण्यात आली.
दरम्यान, या महिलेने पुणे स्टेशनमधील डेपो व्यवस्थापकाकडून होणाऱ्या त्रासाबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी जबाब घेण्यासाठी महिलेस ठाण्यात बोलावले होते. तेथे बराच वेळ लागल्याने ही महिला जेवण करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेली. त्यावेळी भालेकर तिचा पाठलाग करत हॉटेलपर्यंत आला. त्याने महिलेकडे पाहून ‘गुन्हा कसा दाखल करता ते बघून घेतो’, असे म्हणत अश्लील हातवारे करून विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.