लॉकडाऊननंतर 'पीएमपी'चे उत्पन्न आणि प्रवासी संख्या पूर्वपदावर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च २०२० ला करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच 'पीएमपी'चे उत्पन्न आणि प्रवासी संख्या पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे.
PMP-Bus
PMP-BusSakal
Summary

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च २०२० ला करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच 'पीएमपी'चे उत्पन्न आणि प्रवासी संख्या पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे.

कात्रज - कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर २२ मार्च २०२० ला करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर (Lockdown) पहिल्यांदाच 'पीएमपी'चे उत्पन्न (PMP Income) आणि प्रवासी संख्या पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. २०२० नंतर पहिल्यांदाच दैनंदिन प्रवासी संख्या ९ लाखांवर आणि उत्पन्न दीड कोटींच्या पुढे गेले आहे.

कोरोनामुळे 'पीएमपी'चे बस संचलन अत्यावश्यक सेवा वगळता २ सप्टेंबर २०२०पर्यंत पूर्णपणे बंद होते. ३ सप्टेंबरपासून बससेवा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर ३ एप्रिल २०२१ ते मे २०२१ या कालावधीत 'पीएमपी'ला पुन्हा बससंचलन बंद ठेवावे लागले. दोन्ही लॉकडाऊननंतर पीएमपीकडून बससंचलन सुरु करण्यात आले. बससेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे असे वाटत असतानाच ओमिक्रॉनचा संसर्ग वाढल्याने १० जानेवारी २०२२ पासून बस संचलनात पुन्हा कपात कपात करावी लागली होती. मात्र, आता निर्बंध शिथिल करण्यात आल्याने 'पीएमपी'ची वाटचाल पहिल्या लॉकडाऊनपूर्वी असलेल्या दैनंदिन प्रवासी संख्येकडे व उत्पन्नाकडे होऊ लागलेली आहे.

PMP-Bus
पुणे महापालिका : निवडणुकीसाठी लागणार २५ हजार कर्मचारी

लॉकडाऊनपूर्वी २४ फेब्रुवारी २०२०ला 'पीएमपी'ला मिळालेले उत्पन्न १ कोटी ५० लाखांपेक्षा जास्त होते. त्यानंतर जवळपास २ वर्षांनी पीएमपीची दैनंदिन प्रवासी संख्या ९ लाखांपर्यंत पोहोचली असून १४ फेब्रुवारी २०२२ रोजी एकूण १५४७ इतक्या बसेस संचलनात होत्या. तसेच या दिवशी महामंडळाला १ कोटी ५० लाख २२ हजार ३२६ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.

प्रतिक्रिया

प्रवाशांच्या सेवेत असलेल्या रातराणी, पुणे दर्शन व महिलांसाठी खास तेजस्विनी बससेवा या सर्व सेवा पूर्ववत सुरु करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊननंतर प्रवासी पीएमपी बस प्रवासाला प्राधान्य देत असून यामुळे दैनंदिन प्रवासी संख्येसह दैनंदिन उत्पन्नात वाढ होऊन पीएमपीची बससेवा पूर्वपदावर येत आहे. सध्या पीएमपीच्या दररोज सुमारे १५४०पेक्षा जास्त बसेस मार्गावर संचलनात आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी 'पीएमपी'च्या बससेवेचा वापर करावा.

- दत्तात्रय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com