esakal | पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये 3 सप्टेंबरपासून पीएमपीची प्रवासी बससेवा
sakal

बोलून बातमी शोधा

pmp bus

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीची प्रवासी बससेवा 3 सप्टेंबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय दोन्ही महापालिकांनी घेतला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी दिली.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये 3 सप्टेंबरपासून पीएमपीची प्रवासी बससेवा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे -  पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीची प्रवासी बससेवा 3 सप्टेंबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय दोन्ही महापालिकांनी घेतला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी दिली. पीएमपीच्या 25 टक्के बस पहिल्या टप्प्यात रस्त्यावर धावतील. 

पीएमपीची वाहतूक सुरू करण्याबाबत पुणे महापालिकेतून गुरुवारी ऑनलाइन बैठक झाली. या प्रसंगी महापौर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे, पुण्याच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे रुग्ण अजूनही सापडत आहेत. तसेच, गणेशोत्सवात रस्त्यावर नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे बससेवाही गणेशोत्सव पार पडल्यावर सुरू करावी, असा सूर बैठकीत उमटला होता. दरम्यान स्वारगेट, मनपा, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, हडपसर, कात्रज, माळवाडी, कोथरूड, वाघोली, निगडी, भोसरी, पिंपरी, चिंचवड आदी गर्दीच्या स्थानकांवरून गर्दीच्या वेळात जादा 120 शटल बससेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असतील, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पीएमपीची दोन्ही शहरांतील वाहतूक 18 मार्चपासून टप्प्याटप्प्याने बंद केली आहे. 25 मार्चपासून प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. मात्र, अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीची वाहतूक सुरू आहे. त्यात सध्या 250 बस दररोज दोन्ही शहरांत धावत आहेत. प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्यामुळे पीएमपीचे गेल्या पाच महिन्यांत सुमारे 225 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच पीएमपीचे सुमारे पाच हजार कर्मचारी दोन्ही महापालिकांत प्रतिनियुक्तीवर पाठविले आहेत. 

अशी होणार बससेवा सुरू 
पुणे-पिंपरीतील 190 मार्गांवर 480 बस धावणार 
 प्रत्येक बसमध्ये कमाल 22 प्रवासी असतील. 
प्रत्येक फेरीनंतर बस सॅनिटाईज करणार 
बसमधील वातानुकूल यंत्रणा बंद ठेवणार 
प्रत्येक बसमध्ये सीटवर मार्किंग होणार 

loading image
go to top