Hadapsar Railway StationSakal
पुणे
Hadapsar Railway Station : ‘पीएमपी’ बसस्थानकासाठी हडपसर रेल्वेस्थानक परिसरात जागेची पाहणी
PMPML : पीएमपीकडून हडपसर रेल्वे स्थानक परिसरात प्रस्तावित बसस्थानक आणि पार्किंगसाठी जागेची पाहणी करण्यात आली असून याबाबत रेल्वे प्रशासनाला अधिकृत प्रस्ताव सादर केला आहे.
पुणे : सार्वजनिक वाहतुकीत सुसूत्रता आणि सुलभता आणण्यासाठी ‘पीएमपी’च्या वतीने हडपसर रेल्वे स्थानक परिसरात प्रस्तावित बसस्थानक आणि वाहनतळासाठी जागेची पाहणी करण्यात आली. ‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांनी मंगळवारी जागेला भेट देऊन या प्रकल्पाबाबत आढावा घेतला.