esakal | पीएमपी प्रवासात चोरट्यांकडून महिला, वृद्धांना केले जातेय लक्ष्य | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML
पीएमपी प्रवासात चोरट्यांकडून महिला, वृद्धांना केले जातेय लक्ष्य

पीएमपी प्रवासात चोरट्यांकडून महिला, वृद्धांना केले जातेय लक्ष्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या वृद्ध महिला प्रवाशांकडील सोन्याची बांगडी, रोख रक्कम व मोबाईल असा 46 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. हि घटना शनिवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास वाकडेवाडी येथील पीएमपी बसथांब्याजवळ घडला. मागील काही दिवसांपासूनच बसमधील चोरीच्या घटना वाढत असून चोरट्यांकडून वृद्ध महिलांना लक्ष्य केले जात आहे.

याप्रकरणी, एका 66 वर्षीय महिलेने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सिंहगड रस्ता परिसरातील विठ्ठलवाडी येथील रहिवासी आहेत. त्या व त्यांच्या मैत्रीणी शनिवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास वाकडेवाडी परिसरातील थांब्यावरून बसमध्ये बसून निगडीकडे निघाल्या होत्या. त्यावेळी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी फिर्यादींच्या नकळत त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी चोरली. त्याचबरोबर फिर्यादीच्या मैत्रीणीच्या पर्समधील रोख रक्कम व मोबाईलही चोरला.

चोरी झाल्याचा प्रकारा लक्षात येताच त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे करीत आहेत.

दरम्यान, शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पीएमपीमधून प्रवास करणाऱ्या महिला, वृद्ध नागरीकांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून त्याचा फटका नागरीकांना बसत आहे. चोरट्यांच्या टोळ्या बसथांबे, बसस्थानकांवर सक्रीय असूनही पोलिसांकडून चोरट्यांना बेड्या ठोकण्यासाठी ठोस प्रयत्न केला जात नसल्याबद्दल नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

loading image
go to top