PMP Bus
sakal
पुणे - पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पीएमपी प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांत पीएमपीमधील भाडेतत्वावरील बसच्या अपघातांमध्ये वाढ झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याशिवाय पीएमपीची प्रतिमा देखील मलिन झाली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाने चालकांसाठी नवीन नियमावली लागू केली आहे.
पीएमपी प्रशासनाने बस चालकांसाठी नवीन नियमावली लागू करताना चालकांना विविध स्तरावर खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत काही उपाययोजना सुचविल्या आहेत.