
Pune News : पुणेकरांना मनस्ताप! PMPML बस गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांचा अचानक संप
पुणे : पीएमपीएमएल बस गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांचा अचानक संपावर गेल्याने सामन्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आज अचानक पुकारलेल्या संपामुळे शहरात पीएमपीएल बस गाड्यांची संख्या कमी झाली आणि यामुळे नागरिकांचे हाल झाल्याचे पाहायला मिळाले.
बस पुरवणाऱ्या ठेकेदारांचे तीन महिन्यांपासूनचे बिल थकल्यामुळे ४ ठेकेदारांनी अचानक संप पुकारला आहे. याचा थेट फटका सामान्य पुणेकरांना बसला आहे. आज रविवारी संध्याकाळी रस्त्यावर पी एम पी एल ची बस संख्या झाली कमी झाली.
पीएमपीएमएलकडे सध्या २१४२ बसेस आहेत. यापैकी ११०० बसेस या ठेकेदारांच्या असून इतर ९०० बसेस या पीएमपी मालकीच्या आहेत. ठेकेदारांनी अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा त्यांना वेळेवर थकबाकी मिळालेली नाही.
त्यानंतर ओलेक्त्रा, ट्रॅव्हल टाईम, हंसा, अँथोनी या ठेकेदारांनी आज संप पुकारला. आज रविवार असल्याने या संपाचा फटका पुण्यात दिसला नसला तरी उद्यापासून हा संप मागे घेतला नाही तर सामान्य नागरिकांवर याचा ताण येण्याची शक्यता आहे.