Pune News : पीएमपीच्या कंत्राटदारांचा संप मिटला, मंगळवारपासून बस सेवा पूर्ववत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML contractors strike ends bus service restored from Tuesday pune

Pune News : पीएमपीच्या कंत्राटदारांचा संप मिटला, मंगळवारपासून बस सेवा पूर्ववत

पुणे : थकित बिलापोटी ६६ कोटी मिळाल्यानंतर पीएमपीच्या चार कंत्राटदाराने सोमवारी रात्री अखेर संप मागे घेतला.दोन दिवस चाललेल्या संपात सुमारे आठ लाख प्रवाशांना फटका बसला.उर्वरित रक्कम देखील लवकरच दिली जाणार आहे. मंगळवार पासून पिएमपी ची बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.संप मिटल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पीएमपीच्या चार कंत्राटदारांचे चार महिन्यांचे ९९ कोटी रुपयांचे बिल थकल्याने रविवारी दुपारपासून त्यांनी संप सुरु केला. संपात सुमारे ९०७ बस सहभागी झाल्याने रविवारी व सोमावरी मोठ्या प्रमाणात पिएमपी ची प्रवासी सेवा बाधित झाली होती. सोमवारी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेने ९० कोटी रुपये पीएमपी प्रशासनाला दिले.

यात पुणे महापालिकेने ५४कोटी तर पिंपरी चीचवड महापालिकेने ३६ कोटी रुपये दिले.त्यापैकी कंत्राटदारांचे ६६ कोटी रुपये देण्यात आले.तर २४ कोटी रुपये हे' एमएनजीएल' चे देण्यात येणार आहे. कंत्राटदारांचे नोव्हेंबर ते फेब्रुवारी असे चार महिन्यांचे बिल थकले होते. पैकी नोव्हेंबर ते जानेवारी असे तीन महिन्यांचे बिल सोमवारी देण्यात आले. संपात ओलेक्ट्रा, ट्रॅव्हल टाइम, अँथनी व हंसा या चार कंत्राटदारांनी सहभाग नोंदविला होता.

राजकीय नेत्यांचे भेटी

पीएमपी ची बस सेवा पूर्ववत व्हावी याकरिता सोमवारी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पीएमपीचे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांची भेट घेऊन चर्चा केली. यात आमदार रवींद्र धंगेकर, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांचे शिष्ट मंडळ, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप प्रवक्ते प्रदीप देशमुख , संतोष नांगरे आदीनी देखील भेट घेऊन संपावर तोडगा काढण्याची मागणी केली होती.

वेतन थकल्याने चार कंत्राटदारांनी संप केला होता.सोमवारी थकित रकमेतील ६६ कोटी रुपये देण्यात आले. मंगळवार पासुन बस सेवा पूर्ववत होईल.

- ओमप्रकाश बकोरिया,अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल,पुणे.

टॅग्स :StrikePMPMLPMPML Bus