

PMPML seeks 24 reserved land parcels from Pune Municipal Corporation for new bus depots
esakal
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात पुढील काळात सुमारे दोन हजार नव्या बसची भर पडणार आहे. पण या बस लावण्यासाठी डेपोच उपलब्ध नाहीत. महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी) पीएमपीसाठी राखीव असलेल्या ३२ जागांपैकी २४ जागा तातडीने ताब्यात देण्याची मागणी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी केली आहे. त्यावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यासंदर्भातील अहवाल ३० दिवसांत सादर करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत.