

PMPML Seeks Land for Expansion
Sakal
पुणे : आगामी काही महिन्यांत ‘पीएमपी’च्या ताफ्यात आणखी दोन हजार नवीन बस दाखल होणार आहेत. त्यानंतर ताफ्यातील एकूण बसची संख्या सुमारे चार हजार होणार आहे. त्यामुळे अस्तित्वातील १७ आगारांची संख्या अपुरी पडणार आहे. हे लक्षात घेत प्रशासनाला आणखी नवीन १३ आगारांची गरज भासणार आहे. यासाठी १२२ एकर जागेची आवश्यकता असून त्यासंदर्भातला प्रस्ताव नीती आयोगाकडे सादर करण्यात आला आहे.