PMP Bus
sakal
पुणे - एप्रिल-मे २०२६पर्यंत ‘पीएमपी’च्या ताफ्यात तब्बल अडीच हजार नवीन बस दाखल होणार आहेत. त्यामुळे बस मार्गांची पुनर्रचना, फेऱ्यांच्या संख्येबाबत पीएमपी प्रशासन पुनरावलोकन करत आहे. सध्या ३९४ बस मार्ग आहेत.
त्यांचे पुनरावलोकन झाल्यानंतर यात किमान शंभरची वाढ होईल. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होईल. परिणामी पुणे, पिंपरी-चिंचवडसह ‘पीएमआरडीए’ क्षेत्रात ‘पीएमपी’चा विस्तार अधिक व्यापक होणार आहे.