
पुणे / पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) रक्षाबंधनाच्या दिवशी शनिवारी (ता. ९) दोन कोटी ६१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. हा आकडा विक्रमी ठरला. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात यंदा तब्बल ७२ लाख आठ हजार रुपयांनी वाढ झाली. यात तिकीट दरातील वाढ हे सुद्धा महत्त्वाचे कारण आहे. ‘पीएमपी’च्या इतिहासात प्रथमच एका दिवसात अडीच कोटींचा टप्पा पार केला.