Pune : पूर्व हवेलीतील अनधिकृत बांधकामांवर PMRDA ची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : पूर्व हवेलीतील अनधिकृत बांधकामांवर PMRDA ची कारवाई

Pune : पूर्व हवेलीतील अनधिकृत बांधकामांवर PMRDA ची कारवाई

sakal_logo
By
जनार्दन दांडगे.

लोणी काळभोर : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ('पीएमआरडीए') कार्यक्षेत्रात बांधकाम करताना मिळकत धारकांनी परवानगी घेऊनच बांधकाम करावे. अन्यथा अवैध केलेल्या बांधकामावर कारवाई केली जाईल. असा इशारा अनधिकृत बांधकाम विभागाच्या उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी दिला आहे.

पुणे -सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी व सोरतापवाडी (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील सहा अनाधिकृत बांधकामावर बुधवारी (ता. १७ ) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बांधकाम विभागाने ('पीएमआरडीए') कारवाई केली. यावेळी मोनिका सिंघनि 'सकाळ'शी बोलताना हि माहिती दिली.

यावेळी पीएमआरडीएचे सहआयुक्त बन्सी गवळी, पोलीस उपायुक्त तथा नियंत्रक निलेश अष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम विभागाच्या उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह, कनिष्ठ अभियंता सुदर्शन जाधवर, पीएमआरडीएचे अधिकारी आणि कर्मचारी आदीनी ही कारवाई केली आहे.

यापुढे बोलताना मोनिका सिंघ म्हणाल्या, "यापुढील काळातही अनधिकृत बांधकामे हटविण्याची मोहीम तीव्र केली जाणार असून नागरिकांनी विनापरवानगी केलेल्या बांधकामावर कारवाई केली जाईल.

दरम्यान, कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा येथील २ हजार चौ. फूट ची ५ अनाधिकृत बांधकामे जेसीबी मशिनच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली तर, सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर २५६ वरील दीड हजार चौरस फूटाची अनाधिकृत बांधकामावरही कारवाईचा बडगा यावेळी बांधकाम विभागाने उचलला. कारवाई वेळी लोणी काळभोर पोलिसांचा मोठा फौजफाटा सदर ठिकाणी तैनात करण्यात आला होता.

loading image
go to top