

PMRDA Mandates Physical Site Inspection for Construction Permits
Sakal
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील बांधकाम परवानग्यांवर आता काटेकोरपणे लक्ष ठेवले जाणार आहे. बांधकाम मंजुरीसाठी अर्ज आलेल्या स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यानुसार सहायक नगररचनाकार (एटीपी) प्रत्यक्ष तपासणी करणार आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना चाप बसेल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.