Pune : पीएमआरडीएकडून अनधिकृत इमारतीवर धडक कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Encroachment
पुणे : पीएमआरडीएकडून अनधिकृत इमारतीवर धडक कारवाई

पुणे : पीएमआरडीएकडून अनधिकृत इमारतीवर धडक कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बावधन - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) भूगाव माताळवाडीफाटा येथील दोन अनधिकृत इमारतींवर धडक कारवाई करीत हातोडा मारला. यात एका इमारतीसह मंगल कार्यालयाचाही समावेश आहे. अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याची पीएमआरडीएची तालुक्यात पहीलीच वेळ आहे.

कोकणाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाजवळ माताळवाडी फाटा येथे सर्व्हे नंबर 29/2 मधील रस्त्यावर रहिवास आणि वाणिज्य प्रयोजनाकरीता आरसीसी बांधकामाची 6400 चौरस फुटाची अनधिकृत इमारत बांधली होती. तसेच गट नंबर 513 मध्येही सौरभ मंगल कार्यालयाचे 8200 चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम केले होते. याबाबत दोन्ही इमारतींच्या मालकांना पीएमआरडीएने नोटीस पाठविल्या होत्या.

हेही वाचा: माऊलींचा 725वा संजीवन समाधी सोहळा; पाहा व्हिडीओ

शुक्रवारी (26 नोव्हेंबर) सकाळी पोलिस उपायुक्त निलेश अष्टेकर, पीएमआरडीएच्या तहसिलदार मनिषा तेलभाते यांच्यासह इंजिनिअर आणि पौड पोलिस यांचा ताफा माताळवाडीफाट्यावर आला. त्यांनी पोकलेनच्या सहाय्याने दोन्ही इमारती पाडल्या. अचानक झालेल्या या कारवाईमुळे घटनास्थळी बघ्यांचीही गर्दी जमली होती. दोन्ही इमारतींच्या 14600 चौरस फुटाच्या अवैध बांधकामावर पीएमआरडीएने धडक कारवाई केली.

यापूर्वी वाघोली, शिरूर (कारेगाव), हिंजवडी कुंजीरवाडी आणि सोरतापवाडी या परिसरातही अवैध बांधकामाविरुद्ध पीएमआरडीएने कारवाई केली. कारवाईची ही मोहीम अशीच सुरू राहणार असून यापुढे कोणीही विनापरवाना बांधकाम करू नये असे आवाहन तहसिलदार मनिषा तेलभाते यांनी केले आहे.

loading image
go to top