
PMRDA News
Sakal
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (पीएमआरडीए) प्रादेशिक आणि तालुकास्तरीय कार्यालयांना मंजुरी मिळाली आहे. आता कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुरू आहे. सुमारे ५० कर्मचाऱ्यांवर विविध कार्यालयांची जबाबदारी देण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील कार्यालयांत यावे लागणार नाही.