
PMRDA Land Return
Sakal
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) साडेएकोणीस हेक्टर जमिनीच्या परताव्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याचे वाटप ९० शेतकऱ्यांना होणार आहे. १९७२ ते १९८३ या काळात विविध विकासकामांसाठी शेतकऱ्यांकडून ही जमीन संपादित करण्यात आली होती. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेले शेतकरी आणि त्यांच्या वारसांना यामुळे दिलासा मिळणार आहे.