PMRDA housing scheme latest news
esakal
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील ६७४ गावांमधील ‘पंतप्रधान आवास योजने’ला गती देण्यासाठी पीएमआरडीएने विशेष ‘ॲक्शन प्लॅन’ तयार (PMRDA PMAY Housing Scheme Pimpri) केला आहे. केवळ अर्ज मागवून न थांबता, पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.