

PMRDA Infrastructure Projects in Pune Delayed Rs 3906 Crore Development Works Yet to Begin Due to Land and Tender Issues
sakal
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) तीन हजार ९०६ हजार कोटींहून अधिक निधीचे सहा प्रकल्प अजूनही कागदावरच आहेत. यासाठी वर्षभरापूर्वी कार्यवाही अपेक्षित असताना भूसंपादन, निविदा प्रक्रिया आणि अंतिम अहवाल अशा कारणांमुळे यातील एकही प्रकल्प पुढे सरकलेला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासह अनेक प्रश्नांचे आव्हान प्रशासनासमोर आहे.