Navale Bridge Accidents : नवले पुलाला रिंगरोडचा तोडगा, जिल्हाधिकारी डुडी; जांभूळवाडी ते गहुंजे रस्त्याचा पर्याय
PMRDA Ring Road 40 KM Route : नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी जड वाहनांची वाहतूक वळवण्यासाठी पीएमआरडीएच्या जांभूळवाडी-गहुंजे रिंगरोडच्या पर्यायावर जिल्हा प्रशासनाचे एकमत झाले असून, लवकरच कामाचे नियोजन केले जाईल.
पुणे : नवले पुलावर होणारे अपघात रोखण्याबरोबरच जड वाहनांची वाहतूक वळविण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ आणि ‘पीएमआरडीए’ यांच्या रिगरोडच्या पर्यायांची जिल्हा प्रशासनाने पाहणी केली. त्यात ‘पीएमआरडीए’च्या रिंगरोडचा पर्याय पुढे आला आहे.