

PMRDA structural plan aims to enhance connectivity and development across 700 villages in Pune district.
sakal
पुणे : पुणे महानगर परिसरातील सुमारे ७०० गावांच्या हद्दीचा संरचनात्मक आराखडा (स्ट्रक्चरल प्लॅन) करण्याचा इरादा पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) जाहीर केला आहे. राज्य सरकारने ‘एमआरटीपी’ ॲक्टमधील तरतुदीमध्ये गेल्यावर्षी बदल केला. त्यानुसार राज्यात हद्दीच्या विकास आराखड्यापूर्वी संरचना आराखडा तयार करणारी पीएमआरडीए ही पहिली स्थानिक स्वराज्य संस्था ठरली आहे.