State Confirms Same TOD Rules for PMC and PMRDA

State Confirms Same TOD Rules for PMC and PMRDA

Sakal

PMRDA News : पुणे महापालिकेच्या मेट्रो नियमांची पीएमआरडीएत अंमलबजावणी का नाही? बांधकाम व्यावसायिकांचा सवाल

State Confirms Same TOD Rules for PMC and PMRDA : राज्य सरकारने PMC आणि PMRDA दोन्हींसाठी मेट्रो टीओडी झोनचे समान नियम स्पष्ट करूनही PMRDA दोन वेगळे नियम लावत असल्याने बांधकाम व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Published on

पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीत मेट्रो स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरात (टीओडी झोन) जे नियम लागू आहेत, तेच नियम पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील मेट्रो स्टेशनच्या परिसरासाठी लागू आहेत, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. तरीदेखील नियमात स्पष्टता नाही, असे कारण देत मेट्रो स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरातील बांधकामांना परवानगी देताना प्राधिकरणाकडून दोन नियम का लावले जात आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com