
PMRDA Update
Sakal
पिंपरी : करारातील नियमांनुसार बांधकाम व्यावसायिक (विकसक) सदनिकाधारकांना अपेक्षित नागरी सुविधा देत नसल्याच्या तक्रारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) दाखल होत आहेत. त्यामुळे अशा बांधकाम प्रकल्पांची पाहणी करून तथ्य आढळल्यास प्रकल्प थांबविण्यात येतील, असा इशारा आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिला आहे.