

PNG Gas Connection
esakal
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे चार लाख सदनिकाधारकांना महिनाभरात घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) जोडणी कार्यान्वित करून घ्यावी लागणार आहे. सोसायट्यांमध्ये पीएनजीचे जाळे उपलब्ध असूनही एलपीजी सिलिंडरचा वापर करणाऱ्या नागरिकांनी १ ऑक्टोबरपूर्वी पीएनजी जोडणीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) केले आहे.