Pune Koyta Gang : धायरीत कोयता गँगची धिंड,पोलिसांची जरब संपली काय? सामान्य नागरिकांना प्रश्न...

धायरी फाटा ते धायरी गाव दरम्यान कोयता गँगची धिंड काढण्यात आली.
police action pune koyta gang rally Dhayri Phata to Dhayri village pune
police action pune koyta gang rally Dhayri Phata to Dhayri village punesakal

धायरी : भैरवनाथ मंदिरा जवळील भाजी मंडई येथे कोयते हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या आणि एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करणाऱ्या सराईत तीन गुंडांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक करून, धायरी फाटा ते धायरी गाव दरम्यान कोयता गँगची धिंड काढण्यात आली.

गुंड मनोज कटीमनी, रोहित राठोड आणि रोशन आढाव अशी त्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत राजूरकर,सहाय्यक निरीक्षक भरत चंदनशिव,फौजदार निकेतन निंबाळकर, शिपाई अमोल कट्टे, नीलेश खांबे आदींनी या मस्तवाल युवकांना पकडले.

कोयता गॅंगचा वाढता उपद्रव लक्षात घेऊन पोलीस कारवाईत वाढ झाली आहे. तथापि, सकाळी आणि सायंकाळी भर गर्दीच्या वेळी अतिशय भरधाव वेगाने, चित्रविचित्र हाॅर्न वाजवत वाहने पिटाळणे,वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने येत दांडगाई करणे,

कोयता, तलवारींचा धाक दाखवून खंडणी मागणे, मनाविरुद्ध वागणाऱ्यांना मारहाण करणे असे प्रकार सुरुच आहेत.अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे आकर्षीत झाली आहेत का? त्यामुळे समाजाला व पोलीस दलाला देखिल डोकेदुखी झाली आहे.

गुंडगिरी , गुन्हेगारीच्या प्रकारांना अटकाव करण्यासाठी पोलीस संबंधितांची धिंड काढतात, तरीही गुन्हे कमी होत नसल्यामुळे पोलीस ही चक्रावून गेले आहेत. परिसरात पोलिसांची गस्त वाढविली जावी, अचानक विविध भागात शस्त्र तपासणी मोहीम राबविली जावी, अशा मागण्या नागरिक करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com