बारामतीत मटका व्यावसायिकांचा व्हॉट्सऍप ग्रुप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police action WhatsApp group of matka traders Baramati

बारामतीत मटका व्यावसायिकांचा व्हॉट्सऍप ग्रुप

बारामती : शहर पोलिसांनी आज एका मटका अड्ड्यावर केलेल्या कारवाईमध्ये बारामती शहरातील मटका व्यावसायिकांचा एक व्हाट्सअप ग्रुप असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांच्या हाती आता या ग्रुपच्या माध्यमातून सर्व मटका व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकांची यादीच पडणार असून या सर्वांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.

बारामती शहरातील अनंत आशा नगर परिसरात एका खोलीमध्ये मटका चालविला जातो, अशी माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी संयुक्त कारवाई करत एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतले. यावेळेस एका स्मार्ट मोबाईल मध्ये मटका व्यवसायात कार्यरत असलेल्याचा ग्रुप असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या ग्रुप मध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाई करण्यात येणार असून डिलिट केलेले मेसेज देखील शोधून काढण्यात येणार आहेत, असे सुनील महाडिक यांनी सांगितले.

दरम्यान ज्यांच्याकडे अवैध व्यवसाय याबाबत माहिती आहे, त्यांनी ती नेमकी माहिती पोलिसांना द्यावी आणि आपले नाव गुप्त राहणार नाही असे वाटत असल्यास 112 क्रमांकावर दूरध्वनी करून ही माहिती दिली, तरीही पोलिस कारवाई करतील अशी ग्वाही सुनील महाडिक यांनी दिली आहे.

Web Title: Police Action Whatsapp Group Of Matka Traders Baramati

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top