'तो' मेसेज आला अन् बारामतीत पोलिसांची उडाली तारांबळ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

- शहरातील व्यवहार आजपासून सुरु होणार या अफवेने आज पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

बारामती : शहरातील व्यवहार आजपासून सुरु होणार या अफवेने आज पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. रेड झोनमधील विभाग असल्याने शासनाच्या पुढील आदेश येईपर्यंत बारामतीचे व्यवहार सुरु होणार नसल्याचे आज अखेर उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना जाहीर करावे लागले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आजपासून व्यवहार सुरु होणार अशा अफवा काही जणांनी सोशल मीडियावरुन पसरविल्याने लोकांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. लोक अचानक रस्त्यावर यायचे प्रमाण वाढल्यानंतर पोलिस सतर्क झाले व सर्वांनाच विनंती करुन घरात थांबण्यास सांगितले गेले. त्यानंतर शिरगावकर यांनी एक व्हिडिओ व्हायरल करत लोकांना घराबाहेर पडू नये व व्यवहार सुरु करण्याची घाई करु नये, असे आवाहन केले. त्यानंतर पुन्हा परिस्थिती पूर्ववत झाली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांविरुध्द कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. कोणताही मेसेज फॉरवर्ड करताना त्याची खात्री करुनच तो पुढे पाठवावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी नमूद केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Alert after Fake Message Viral about Lock Down