Police and Rescue Team Recover Body of Citizen Who Drowned in Water
sakal
जुन्नर - जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरणात मासेमारी करण्यासाठी गेल्यानंतर पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या नागरिकाचा मृतदेह शोधण्यात पोलिस प्रशासन व रेस्क्यू पथकाला यश आले. गुरुवार ता. 9 रोजी सायंकाळी माणिकडोह धरणात काळू कृष्णा सांगडे (वय-59 वर्षे) रा. हडसर, ता. जुन्नर हे त्यांचे सहकारी युवराज मारुती सांगडे यांच्यासोबत मासेमारी करण्यासाठी गेले होते.