चिंताजनक! 'त्यांनी' पुणे, मुंबईहून आलेल्यांना दिला आश्रय: पुढे घडले असे...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

 पुणे, मुंबईहून आलेल्यांना आश्रय दिल्याप्रकरणी करावाई

वालचंदनगर : पुणे व मुंबईहून आलेल्या 11 नागरिकांना आश्रय दिल्याप्रकरणी अंथुर्णे (ता. इंदापूर) येथील चार जणांवर भारतीय साथीचा रोग अधिनियमानूसार गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा- Lockdown :शेतकऱ्यांवर मोठे संकट; झेंडू फुलला पण...

याप्रकरणी सिताराम कोंडीबा शिंदे, बापू विठ्ठल गायकवाड, संजय विठ्ठल जाधव, नारायण बजरंग माने (रा. अंथुर्णे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अंथुर्णे गावामध्ये पुणे व मुंबईहून 11 नागरिक राहण्यासाठी आले आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

या नागरिकांना या चौंघाना राहण्यासाठी आश्रय दिला आहे. हे 11 जण विलगीकरणाचे नियम न पाळता गावामध्ये मास्क न वापरता बिनधास्तपणे फिरत होते. अंथुर्णेचे ग्रामसेवक दिपक भोसले यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात चौंघाविरूद्ध फिर्याद दिली आहे. तपास पोलिस हवालदार प्रकाश माने करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The police arrest to 4 person in anthurne