
अनैतिक संबंधातून रिक्षाचालक मित्राचा खुन करुन फरार झालेल्या चार आरोपींना पौड पोलिसांनी ४८ शोधुन अटक केली आहे. गणेश हणमंत पवार (वय ३० रा. वारजे, पुणे) असे खून झालेल्या मृताचे नाव आहे.
माले : अनैतिक संबंधातून रिक्षाचालक मित्राचा खुन करुन फरार झालेल्या चार आरोपींना पौड पोलिसांनी ४८ शोधुन अटक केली आहे. गणेश हणमंत पवार (वय ३० रा. वारजे, पुणे) असे खुन झालेल्या मयताचे नाव आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
याबाबत मयताच्या पत्नीने पोलिसांत अज्ञात आरोपिंविरुध्द फिर्याद दिली होती. पोलिसांनी तपास करुन पोलिसांनी पांडुरंग वीर, रा.सातारा व त्याचे साथीदार सागर ढेपे, शुभम धुमाळ, सचिन मोहिते सर्व रा.वडगाव निंबाळकर या चौघांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी मृत गणेश पवार हा रिक्षाचालक होता. तो व आरोपी पांडुरंग वीर हे मित्र होते. मृत गणेशची पत्नी व आरोपी पांडुरंग यांचे अनैतिक संबंध होते. त्यात मृत गणेश अडथळा ठरत होता. त्यामुळे पांडुरंग व त्याचे साथीदार सागर, शुभम, सचिन यांनी संगनमताने कट रचला. शुक्रवार संध्याकाळी (ता. १६) दारु पिण्याच्या बहाण्याने सर्वजण (पळसे, ता. मुळशी) येथे गेले व रस्त्याच्या कडेला दारु पित बसले. त्यावेळी चौघांनी गणेशच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केले. व आरोपी फरार झाले.
रस्त्याच्या कडेला पडलेल्या गंभीर जखमी गणेश बद्दल पोलिसांना माहिती मिळाल्यावर पौड पोलिसांनी रात्रीत त्याला पौड ग्रामीण रुग्णालयात व नंतर ससून रुग्णालयात दाखल केले परंतू दुस-या दिवशी शनिवार (ता. १७) त्याचा मृत्यू झाला. गणेशच्या पत्नीला याबाबत कल्पना नसल्याने तिने अज्ञात आरोपींविरुध्द फिर्याद दिली.
महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पौड पोलिसांनी तपास सुरु करताच आरोपी व मृताच्या पत्नीतील अनैतिक संबंधांची माहिती हाती लागली. मुख्य आरोपी पांडुरंग यास ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अनैतिक संबधातून साथीदारांच्या मदतीने खुनाची कबुली दिली. परंतू त्याचे तीन साथीदार अद्यापही फरार होते. आरोपी सातारा जिल्ह्यातील लोणंद तालुक्यातील तुकोबाचीवाडी गावचे हद्दीतील डोंगरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर पौड पोलिसांनी सापळा लावून त्यांना शिताफीने पकडून अटक केली.
पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे, अब्दुल शेख, पोलिस नाईक रॉकी देवकाते, सागर बनसोडे, जय पवार, पोलिस शिपाई अक्षय नलावडे, रवींद्र जाधव, सुनिल कदम, सागर नामदास यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
याकामी त्यांना पोलिस उप निरीक्षक श्रीकांत जाधव, पोलिस हवालदार संदीप सपकाळ, शंकर नवले, मंगेश लांडगे, संतोष कुंभार, संजय राक्षे, पोलिस नाईक नितीन कदम, पोलिस शिपाई नाना मदने, मयुर निंबाळकर यांनी मदत केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे हे करीत आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)