esakal | अकरा दुचाकी चोरणारा सराईत पोलिसांच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : अकरा दुचाकी चोरणारा सराईत पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : अकरा दुचाकी चोरणारा सराईत पोलिसांच्या जाळ्यात

sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव : पुणे व नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुचाकीची चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या पथकाने आज खोडद (ता. जुन्नर) येथे अटक केली. आरोपीकडून 4 लाख 10 हजार रुपये किंमतीच्या अकरा दुचाकी जप्त केल्या आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. या प्रकरणी सिद्धार्थ रमेश बर्डे (वय २१, राहणार खोडद, ता. जुन्नर) याला अटक केली असून त्याचा सहकारी असलेल्या वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

नारायणगाव, आळेफाटा भागात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्या नुसार पोलीस आरोपींचा शोध घेत होते दरम्यान खोडद येथील तरुण काही कामधंदा न करता वारंवार विविध प्रकारच्या मोटारसायकल वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

हेही वाचा: नाशिक-पुणे रेल्वे : बाधित शेतकऱ्यांना मिळणार ५ पट मोबदला?

त्या नुसार रविवारी (ता. १३) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील नेताजी गंधारे, विक्रम तापकीर, सचिन गायकवाड, दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, मुकुंद कदम यांनी पाठलाग करून तरुणासह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौकशी केली असता आरोपींनी आळेफाटा, रांजणगाव नारायणगाव, पारनेर, श्रीरामपूर भागात दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून ४ लाख १० हजार रुपये किंमतीच्या अकरा दुचाकी जप्त केल्या आहेत. पुढील तपासासाठी आरोपींना नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

हेही वाचा: पुणे-सोलापूर महामार्ग परिसरातील अपघातात महिलेचा मृत्यू

loading image