esakal | पुणे-सोलापूर महामार्ग परिसरातील अपघातात महिलेचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-सोलापूर महामार्ग परिसरातील अपघातात महिलेचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्ग परिसरातील अपघातात महिलेचा मृत्यू

sakal_logo
By
जनार्दन दांडगे, उरुळी कांचन

लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी गणपतीचे दर्शन घेऊन बारामतीला परत चाललेल्या महिलेचा पुणे-सोलापूर महामार्ग ते थेऊर रस्त्यावर कुंजीर वस्तीजवळ अपघात झाला. या अपघातात महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (ता. १३) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला. भाग्यश्री श्रीकृष्ण प्रभुणे (वय २८, रा. सिद्धेश्वर गल्ली, बारामती, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर या अपघातात श्रीकृष्ण प्रभुणे (वय ३८) हे किरकोळ जखमी झाले आहेत. (woman dies in pune-solapur highway accident)

हेही वाचा: नाशिक-पुणे रेल्वे : बाधित शेतकऱ्यांना मिळणार ५ पट मोबदला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण प्रभुणे आणि त्यांची पत्नी भाग्यश्री प्रभुणे हे त्यांच्या हिरोहोंडा कंपनीच्या एम एच ४२ ए सी २२६० या मोटारसायकल वरून थेऊर येथील ''श्री चिंतामणी गणपतीच्या'' दर्शनासाठी आले होते. दर्शन घेताल्यानंतर थेऊर कडून बारामतीच्या दिशेने घरी निघाले होते. थेऊर (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील कुंजीर वस्तीजवळ त्यांची मोटार सायकल साडेपाच वाजण्याच्या सुमारास आली असता, त्यांची मोटारसायकल एका मोठ्या खड्डयातून घसरली. श्रीकृष्ण हे रस्त्याच्या डाव्या बाजूला पडले. तर त्यांची पत्नी भाग्यश्री या रस्त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे उजव्या बाजूला रस्त्यावरच पडल्या. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरचे ( एम एच ४६ एच ४८९७) चाक भाग्यश्री यांच्या अंगावरुन गेले. या अपघातात भाग्यश्री जागीच ठार झाल्या. लोणी काळभोर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरी, पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी करीत आहेत.

हेही वाचा: पुणे : 'साहेबांना भेटायचंय, अँटिजेन टेस्ट करा!'

पुणे-सोलापुर महामार्ग (थेऊरफाटा) ते थेऊर गाव या रस्त्याची मोठ्या प्रमानात अतिशय दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या सुमारे एक ते दीड फुटाचे खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यात खड्डे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी व या रस्त्यावरुन येजा करणाऱ्या नागरीकांच्या आरोग्यासाठी या रस्त्याचे लवकर काम पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी या रस्त्यावरुन दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी, वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये २४० नवीन रुग्ण; ४४२ जणांना डिस्चार्ज

loading image
go to top