तो विमानाने जायचा, चोरीच्या मोटारीतून यायचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

चनप्रीत हरविंदरपाल सिंग (वय ४३, रावेत) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून १२ आलिशान मोटारी व १५ मोटारींची इंजिन असा सुमारे सव्वा दोन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पिंपरी - विमा कंपनीने भरपाई दिलेली अपघातग्रस्त वाहने कागदपत्रांसह विकत घ्यायची. मग तसेच मॉडेल, रंग असलेले वाहन चोरून त्यावर अपघातग्रस्त वाहनाच्या चासीचा नंबर लावून विक्री करायची, अशी शक्कल लढविणाऱ्या हायप्रोफाईल चोरट्याला पोलिसांनी रावेतला जेरबंद केले. तो विमानाने परराज्यांत जाऊन मोटारी चोरायचा आणि त्या चालवत आणायचा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चनप्रीत हरविंदरपाल सिंग (वय ४३, रावेत) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून १२ आलिशान मोटारी व १५ मोटारींची इंजिन असा सुमारे सव्वा दोन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामागे आंतरराज्य टोळी असल्याचा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला संशय असून, त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. चनप्रीत चोरीची वाहने रावेतमधील गणेशनगर येथील गॅरेजमध्ये विक्रीस ठेवायचा. पंजाब, हरियाना, दिल्ली अशा राज्यांत विमानाने जाऊन तो एक मोटार चोरून ती चालवत आणायचा.

#RingRoad रिंगरोडमधून मेट्रो शक्य

या गॅरेजमध्ये चोरलेली दोन वाहने असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून चनप्रीतला ताब्यात घेतले. चनप्रीत हा पंजाब पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर मोटार चोरीचे दहा गुन्हे दाखल आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrest hyperfile thieves in pimpri

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: