Pune Crime News : मंगळसूत्र चोर पोलीसांच्या जाळ्यात ; आठ गुन्ह्यांची कबुली

शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून मारहाण करणाऱ्या अट्टल चोरट्याला सिंहगड रोड पोलीसांनी अटक केली असून त्याने सिंहगड रोड(3), भारती विद्यापीठ (1), अलंकार(1), चतुःश्रृंगी(1) आणि रावेत(2) अशा तब्बल आठ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
Pune Crime News
Pune Crime Newssakal
Updated on

धायरी : शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून मारहाण करणाऱ्या अट्टल चोरट्याला सिंहगड रोड पोलीसांनी अटक केली असून त्याने सिंहगड रोड(3), भारती विद्यापीठ (1), अलंकार(1), चतुःश्रृंगी(1) आणि रावेत(2) अशा तब्बल आठ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सुमित गोविंद इंगळे (वय 28, रा. फ्लॅट नं 109, त्रिपाठी अपार्टमेंट, मारुंजी, हिंजवडी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आनंदनगर येथे दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्याची घटना घडली होती. वारंवार अशा घटना घडत असल्याने पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे कसून शोध सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज वरुन आरोपीची ओळख पटविण्यात पोलीसांना यश आले होते.

दरम्यान संबंधित वर्णणाचा संशयित तरुण नंबर नसलेल्या दुचाकीवर प्रयेजा सिटी समोर रस्त्याच्या कडेला थांबलेला असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून या चोरट्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याने इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे.

Pune Crime News
Katraj Dairy : डेअरी प्रक्रिया उद्योगाचे आरक्षण कायम ठेवा ; दूध संघाच्या संचालक मंडळांसह उत्पादक संस्था आणि शेतकऱ्यांची मागणी

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार, अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, अंमलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, तानाजी तारु, राजू वेगरे, विकास बांदल, अमोल पाटील, अविनाश कोंडे, विकास पांडोळे, देवा चव्हाण, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर , सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहिते, अक्षय जाधव व शिरिष गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com