बहाद्दराने दरवाजा तोडला... रेलिंगवरुन घसरत निघाला..पण...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

तात्पुरत्या कारागृहातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कैद्याला पकडले.

पुणे : वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या कारागृहातून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या कैद्याला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार रविवारी सायंकाळी येरवडा येथे घडला. बाळासाहेब गोविंद कांबळे (वय ५०) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कैद्याचे नाव आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

याप्रकरणी कारागृह शिपाई भगवान पालवे (वय ५१ ) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भगवान पालवे हे येरवडा कारागृहात शिपाई म्हणून कार्यरत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनामुळे येरवडा प्रेस कॉलनी समोरील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात तात्पुरते कारागृह तयार करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता कांबळे याने कारागृहातील तिसऱ्या मजल्यावरील एका रूमचा लाकडी दरवाजा तोडला. त्यानंतर लोखंडी रेलिंगवरुन घसरत तो खाली उतरला. तेथून तो पळून जाण्याच्या तयारीत असताना कारागृह सुरक्षा रक्षकांना त्याची कुणकुण लागली. त्यांनी कांबळे यास ताब्यात घेतले. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल वाघमारे करीत आहेत.

ऐकलतं का? आळंदीत लावले जातेय चोरून लग्न


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrested a prisoner who was preparing to escape

टॅग्स
टॉपिकस