गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करणाऱ्यांनो, सावधान! 

police ban new year celebration parties at forts in pune district
police ban new year celebration parties at forts in pune district

पिंपरी : नववर्षाच्या स्वागतासाठी गड-किल्ल्यांवर 'ओल्या पार्ट्या' करण्याचा विचार आहे, तर सावधान..! कारण राज्यातील सुमारे अकरा गड-किल्ल्यांवर चालणाऱ्या अशा पार्ट्यांवर दुर्गसेवकांची करडी नजर असणार आहे. सोमवारी (ता. 30) आणि मंगळवारच्या (ता. 31) पहाटेपर्यंत दुर्गसेवक पहारा देणार आहेत. "तळीरामांनी गडांचे पावित्र्य राखले नाही, तर पोलिसांकडून तुरुंगाची हवा खावी लागेल'', असा इशाराच दुर्गसेवकांनी दिला आहे. 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या दशकभराहून अधिक काळापासून सह्याद्री प्रतिष्ठानकडून राज्यभरातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे विधायक काम केले जात आहे. श्रमदानासह किल्ल्यांना दरवाजे बसविले जात आहेत. राज्यभरात संस्थेचे सुमारे 600 ते 700 दुर्गसेवक उत्स्फूर्तपणे काम करत आहेत. याअंतर्गत निरनिराळ्या गड-किल्ल्यांवर रात्रीची गस्त आणि पहारा दिला जाणार आहे. याबाबत सह्याद्री प्रतिष्ठानचे कैलास ओव्हाळकर म्हणाले, "दुर्गसंवर्धनाबरोबरच गड-किल्ल्यांचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी समाजात जनजागृतीही केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून जुलैत लोहगड येथे ठोक मोहीम राबविण्यात आली. त्यात अश्‍लील चाळे करणारे प्रेमी युगुल आणि मद्यपींना पकडण्यात आले. असे प्रकार पुन्हा करणार नाही, या हमीवर त्यांना सोडून देण्यात आले. दरवर्षी गड-किल्ल्यांवर 31 डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मद्यपींचा पार्ट्या करण्याकडे कल असतो. मात्र, आम्ही त्यांना तसे करण्यापासून परावृत्त करणार आहोत. त्यासाठी आमचे दुर्गसेवक सोमवारच्या रात्रीपासून मंगळवारच्या पहाटेपर्यंत गस्त घालणार आहोत. याबाबत त्या भागांतील पोलिसांनाही कळविणार असून, आवश्‍यकतेनुसार त्यांची मदत घेतली जाणार आहे. मद्यपींचा वावर असलेल्या गड-किल्ल्यांची आम्ही निवड केली असून, प्रत्येक किल्ल्यांवर आमचे किमान पाच ते कमाल 25 दुर्गसेवक रात्रीची गस्त देणार आहेत.'' 

मावळ्यांनी रक्त सांडले म्हणून... 
राज्यभरातील गड-किल्ल्यांवर इतिहास घडला आहे. तेथे मावळ्यांनी रक्त सांडून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना अभिप्रेत असे स्वराज्य निर्माण केले. त्यामुळे किल्ल्यांचे पावित्र्य राखले जावे, अशी सर्व दुर्गसेवकांची भावना आहे. यासाठी अनेक संस्था-संघटना आणि वैयक्तिकरीत्या दुर्गप्रेमींची मदत होत असते. 

पुणे : बालभारती करणार दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशन (व्हिडिओ)

येथे असेल करडी नजर 
दुर्गसेवकांमुळे काही किल्ल्यांवरील पार्ट्यांना बऱ्याच प्रमाणात पायबंद बसला आहे. 31 डिसेंबरला राजगड, तोरणा, तुंग, तिकोना, राजमाची (पुणे जिल्हा), हरिहर, रामटेक (नाशिक), रायगड, कोथळीगड, पेब, कोरीगड येथे दुर्गसेवक पहारा देणार आहेत.

Video : CAA, NRC विरोधात पुण्यात महारॅली; हजारो नागरिकांची उपस्थिती  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com