अजितदादांच्या इंजेक्शननंतर सुरू झाली एकाच पळापळ...

मिलिंद संगई
Monday, 7 September 2020

अनेकदा अनेक नागरिकांनी नगरपालिककडे तक्रारी केल्या, पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. गेल्या शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार नीरा डावा कालव्याच्या भराव्याचे काम पाहण्यासाठी या ठिकाणी आल्यावर त्यांच्या लगेच हा प्रकार निदर्शनास आला.

बारामती (पुणे) : स्थळ : बारामतीतील तीन हत्ती चौक...अगदी भल्या पहाटेच पोलिस अधिकारी व बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी गाडीतून उतरतात आणि नीरा डावा कालव्याच्या भरावार एकाच पळापळीला सुरुवात होते... 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नीरा डावा कालव्याच्या भराव्यावर तीन हत्ती चौक ते ख्रिश्चन कॉलनी पूलापर्यंत दररोज अनेक लोक सकाळी प्रातःविधी उरकतात. त्यामुळे हा परिसर दुर्गंधीयुक्त असतो. अनेकदा अनेक नागरिकांनी नगरपालिककडे तक्रारी केल्या, पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. गेल्या शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार नीरा डावा कालव्याच्या भराव्याचे काम पाहण्यासाठी या ठिकाणी आल्यावर त्यांच्या लगेच हा प्रकार निदर्शनास आला. या भराव्यावर विविध लोकांनी केलेले प्रातःविधीचे प्रकार पाहून अजित पवार यांनी खास आपल्या शैलीत नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना इंजेक्शन दिले. अजितदादांचे इंजेक्शन घेतल्यानंतर मात्र खडबडून जागे झालेल्या नगरपालिकेने अखेर पोलिसांची मदत मागितली. कारण, अनेक जण नगरपालिका कर्मचाऱ्यांना जुमानतच नव्हते. 
मग सुरु झाला खेळ पळापळीचा.

मतदारांनो, तुम्ही जे पेरलंय, तेच उगवलंय

पहिल्या दिवशी एक अधिकारी व दोन पोलिस कर्मचारी तीन हत्ती चौकाकडून निघाले, तर दुसरे पथक ख्रिश्चन कॉलनीकडून निघाले. दोन्ही बाजूंनी पोलिसच आल्यानंतर प्रातःविधीसाठी बसलेल्यांची चांगलीच पळापळ झाली. लोक डबा घेऊन पुढे आणि पोलिस त्यांच्या मागे काठी घेऊन, असा पळापळीचा हा खेळ पाहणाऱ्यांची याने चांगलीच करमणूक झाली. पण, आता दररोज पोलिसच या भागावर लक्ष ठेवून आहेत म्हटल्यावर कालव्याच्या भराव्यावर कार्यक्रम उरकणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. आता रोज सकाळी पोलिस आणि नगरपालिका कर्मचारी या भागाची दररोज देखरेख करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police in Baramati take action against open defecation