पोलिसांकडून होतीये मारहाण; बारामतीकरांची नाराजी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 March 2020

सबुरीने घ्या, असा सल्ला देऊनही पोलिस अजूनही आक्रमक पध्दतीनेच वागत असल्याचे आज बारामतीत दिसले.

बारामती : सबुरीने घ्या, असा सल्ला देऊनही पोलिस अजूनही आक्रमक पध्दतीनेच वागत असल्याचे आज बारामतीत दिसले. तीन हत्ती चौकात दोन युवकांना पोलिसांनी काठ्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरु नये, हा संदेश सगळीकडेच गेला आहे. मात्र पोलिसांच्या मारहाणीमुळे नागरिकात कमालीच्या नाराजीचा सूर आहे. पोलिसांनी थोडे सबुरीने घ्यायला हवे, या मारहाणीत एखाद्याला गंभीर इजा झाली तर त्याचे परिणाम संबंधित व्यक्तीला कायम भोगावे लागतील, असेही नागरिकांचे मत आहे.

दरम्यान, गरज नसताना लोकांनी रस्त्यावर येऊ नये व पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Beaten to Peoples in Baramati