Police Bharti : पोलिस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीत धावताना तरुणाचा मृत्यू; पोलिस मुख्यालयातील घटना

Police Bharti
Police Bhartiesakal
Updated on

पुणेः पुणे पोलिसांच्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीत धावणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शिवाजीनगर कवायत मैदानावर शनिवारी (ता. ६) सकाळी घडली. तरुणाच्या मृत्युमागचे कारण अद्याप समजले नाही.

तुषार बबन भालके (वय २७, रा. कोठे बुद्रूक, संगमनेर, अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मैदानावर धावताना तो सकाळी आठच्या सुमारास चक्कर येऊन पडला. शवविच्छेदनानंतर मृत्युमागचे निश्चित कारण समजेल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Police Bharti
Devendra Fadnavis : ''प्रवक्त्यांना फारच खुमखुमी असेल तर...'', महायुतीच्या मेळाव्यात फडणवीसांनी वाचाळवीरांना फटकारलं

भालके हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरजवळील कोठे बुद्रूक गावचा आहे. शेतकरी कुटुंबातील तुषार गेल्या काही महिन्यांपासून पोलिस भरतीची तयारी करत होता. पुणे पोलिसांच्या भरती प्रक्रियेदरम्यान त्याने अर्ज केला होता. त्याला भरती संदर्भात कॉल आलेला होता. त्यानुसार, पुण्यात तो भरतीसाठी आला होता. शनिवारी (ता. ६) शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील कवायत मैदानावर मैदानी चाचणी सुरू आहे. भरती प्रक्रियेत सहभागी झालेले ८०० ते ८५० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांना क्रमांक (चेस्ट नंबर) देण्यात आले आहे.

मैदानी चाचणीसाठी धावण्यासाठी एक हजार ६०० मीटरचे अंतर देण्यात आले होते. तुषारने धावण्यास सुरुवात केली. काही वेळात तो मैदानात चक्कर येऊन पडला. तुषार मैदानात चक्कर कोसळल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

Police Bharti
Nashik News : शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मनाई आदेश लागू; पोलीस आयुक्तांकडून अधिसूचना जारी

तुषारच्या मागे आई-वडील, बहीण असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती कळविण्यात आली आहे. ससून रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात मृतदेह देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com