Pune News : पोलिस भरती परीक्षेत कॅापी, तिघांवरच गुन्हा दाखल

पोलिस दलात भरती होऊ इच्छिणार्या तिघांवरच गुन्हा दाखल करण्याची वेळ दौंड पोलिसांवर आली.
police recruitment exam
police recruitment examSkal

दौंड - राज्य राखीव पोलिस दलाच्या सशस्त्र पोलिस कॅान्स्टेबल परीक्षेच्या लेखी परीक्षेत कॅापी केल्याप्रकरणी तीन परीक्षार्थ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायद्याचे रक्षण करीत गुन्हेगारांवर कारवाईसाठी पोलिस दलात भरती होऊ इच्छिणार्या या तिघांवरच गुन्हा दाखल करण्याची वेळ दौंड पोलिसांवर आली आहे.

दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली. दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाच मधील सशस्त्र पोलिस कॅान्स्टेबल पदाच्या परीक्षेसाठी २३ जुलै रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. दौंड - कुरकुंभ महामार्गालगतच्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयात ही परीक्षा सुरू होती.

police recruitment exam
Pune Crime: पैसे परत न केल्यानं सावकाराने पतीपुढेच पत्नीवर केला बलात्कार, पुण्यातील खळबळजनक घटना

विद्यालयातील वर्ग क्रमांक अठरा मधील उमेदवार प्रदिप आबासाहेब गदादे (रा. बेनवडी, ता. कर्जत, जि. नगर) , सुदर्शन उत्तमराव बोरूडे (रा. श्रीगोंदा, जि. नगर) व सतिश शिवाजी जाधव (रा. हिरडगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर) हे कॅापी करताना आढळले. कॅापी करून लेखी परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या प्रयत्नात असताना तिघांना पकडण्यात आले.

police recruitment exam
Pune News: शेतात जायला रस्ताच नाही; महिलेनं हेलिकॉप्टरसाठी सरकारकडं मागितली परवानगी

दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी राज्य राखीव पोलिस दलातील पोलिस नाईक नीलेश धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरूध्द महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उप निरीक्षक महेश आबनावे यांनी दिली. उप निरीक्षक श्री. राऊत या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.

राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाच मधील सशस्त्र पोलिस कॅान्स्टेबल भरती परीक्षा २०२१ करिता मैदानी चाचणी घेण्यात आली होती. या मैदानी चाचणीत प्राप्त गुण आणि सामाजिक आरक्षणानुसार लेखी परीक्षेकरिता १९४४ उमेदवार पात्र ठरले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com