
या धक्कादायक प्रकरणानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा आणि जून्या परंपरेच्या नावाखाली चक्क पुण्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
पुणे : जागेचा न्याय-निवडा करण्यास नकार दिल्याच्या वादातून महिलेसह एका कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे. या वादातून पुण्यातील महिलेला कुटुंबासह एका वर्षासाठी बहिष्कृत करण्याचा निर्णय जात पंचायतीने घेतलाय. या धक्कादायक प्रकरणानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा आणि जून्या परंपरेच्या नावाखाली चक्क पुण्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
Graduate Constituency Election Result 2020 जयंत पाटलांचं फडणवीसांना ओपन चॅलेंज
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण सासवड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. संबंधित कुटुंबियांना 1 लाख रुपये, 5 दारू बाटल्या, 5 बोकड दंड अशी शिक्षा जात पंचायतीने ठोठावली आहे. हा दंड न दिल्यास कायम स्वरूपी बहिष्कार टाकण्यासंदर्भातील घोषणा देखील करण्यात आल्याचे समजते.