police commissioner amitesh kumar, gangstar nilesh ghaywal
sakal
पुणे - कुख्यात गुंड नीलेश घायवळने त्याच्या आडनावात ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असा बदल करीत पोलिस आणि पासपोर्ट विभागाला चकवा देऊन तो स्वित्झर्लंडला पसार झाला. त्याने पासपोर्ट कार्यालयात त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे खोटे शपथपत्र दिल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.