
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन : उरुळी कांचन पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर असणारी मोबाईलची दोन दुकाने फोडून विविध कंपन्यांचे मोबाईल चोरून एक कोटीचा मुद्देमाल लंपास करून फरार झालेल्या आरोपींना उरुळी कांचन पोलिसांनी हरियाणा राज्यातून अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व उरुळी कांचन पोलिसांनी हरियाणा राज्यात ही संयुक्त कारवाई केली आहे. ही घटना मागील महिन्यात १९ जूनला पहाटेच्या सुमारास घडली होती.