बलात्कारप्रकरणी एकास पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कारप्रकरणी खडक पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने आरोपीस २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुणे - अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कारप्रकरणी खडक पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने आरोपीस २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जयकुमार विजयकुमार जोजारे (वय ३३) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी १७ वर्षीय पीडित तरुणीच्या आईने फिर्याद दिली. जोजारे याने पीडित मुलीशी दीड वर्षापूर्वी ओळख वाढविली. त्यानंतर त्याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली. त्यानंतर त्यास न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, आरोपीला गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकील लीना पाठक यांनी केली. त्यानुसार, २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police custody for rape