कोरेगाव-भीमात प्रत्येकावर पोलिसांची नजर (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

 पुणे : कोरेगाव-भीमा परिसरात आज (मंगळवार) पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून, ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या मदतीने प्रत्येकावर नजर ठेवण्यात येत आहे. परिसरात जवळपास 100 व्हिडीओ कॅमेरे आणि 100 सीसीटिव्ही कॅमेरे बसवले आहेत. तर जवळपास 50 ड्रोन कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे परिसरातील परिसरातील प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवणे पोलिस यंत्रणेला सहज शक्य आहे. 

गेल्या वर्षी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षीचा प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी पुरेशी दक्षता घेतली आहे. तब्ब्ल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त पेरणे फाटा परिसरात लावण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पोलिस येथे तळ ठोकून आहेत. राज्याच्या मुख्य नियंत्रण कक्षाला सतत अपडेट दिले जात आहेत. तसेच पुण्यातही पोलिस टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. खासगी वाहनांना विजयस्तंभाजवळ येण्यास मनाई करण्यात आली आहे. ड्रोन कॅमेऱ्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले येत असून प्रत्येकाच्या हलचालींवर नजर ठेवली जात आहे.
 
Web Title: Police eyes each at Koregaon-Bhima (Video)