

बालाजी ट्रस्टकडून पोलिसांना फूड पॅकेट
अनंत चतुर्दशीला होणार वाटप; बंदोबस्तावरील जवानांना पौष्टिक अन्न
सातारा, ता. २० : गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी झटणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवेची जाणीव ठेवत येथील श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गेली २८ वर्षे बंदोबस्तावरील पोलिस जवानांना पौष्टिक अन्नाचे फूड पॅकेट वाटप करत असते. यंदाही असाच उपक्रम अनंत चतुर्दशी व त्याच्या आदल्या दिवशी राबवण्यात येणार आहे.
उपक्रमाची माहिती देताना श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे म्हणाले, ‘‘गणरायाचे आगमन ते विसर्जनापर्यंत पोलिस अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी कार्यरत असतात. या काळात ते कुटुंबांपासून दूर असतात. सणाचा आनंद सर्वांना घेता यावा म्हणून ते स्वतःच्या सणाचा त्याग करतात. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस जवानांना ना वेळेवर अन्न मिळते, ना पाणी. त्यांच्या या निःस्वार्थ सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न १९९९ पासून सुरू केला असून, उपक्रमाचे यंदाचे २८ वे वर्ष आहे.
पोलिस प्रशासनानेही श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले आहे. ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाऱ्या फूड पॅकेटमध्ये दोन चपात्या, भाजी, मसालेभात, शेंगदाणा चटणी यांचा समावेश असतो.
या उपक्रमात ट्रस्टचे सचिव संजय कदम, उदय गुजर, अंबाजी देसाई, जगदीश खंडेलवाल, दीपक मेथा, हरिदास साळुंखे, संतोष शेंडे, संजय निकम, राजेंद्र खंडेलवाल, नितीन माने, जगदीप शिंदे, विश्वनाथ फरांदे, श्रावण पाटील, तसेच ट्रस्टचे सदस्य व पदाधिकारी, नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग असल्याचेही श्री. चोरगे यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.