pune police
sakal
पुणे
Pune News : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरसावले पोलिस दल; नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबविणार, शस्त्रसज्ज पोलिसांचा पहारा
पुणे शहरात टोळीयुद्ध, वाहनांची तोडफोड, गुंड टोळक्यांकडून कोयत्याचा वापर, घरफोडी अशा स्वरूपाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
पुणे - शहरात टोळीयुद्ध, वाहनांची तोडफोड, गुंड टोळक्यांकडून कोयत्याचा वापर, घरफोडी अशा स्वरूपाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबवून संशयास्पद वाहनांची तपासणी, गुन्हेगारांवर लक्ष, अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईचा आदेश त्यांनी दिला आहे.